प्रत्येक देशाकडे व्यवहारासाठी आपली एक करन्सी आहे. जगातील सगळे देश कागदी नोटांच्या रुपात व्यवहार करतात. परंतु झिम्बाम्वे या देशात कागदाच्या करन्सीच्या जागी सोन्याच्या नाण्यामध्ये व्यवहार केले जाणार आहेत आणि सोन्याचे नाणे व्यवहारासाठी वापरणारा झिम्बाम्वे हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.(zimbabwe) झिम्बाम्वेने हा निर्णय यासाठी घेतला आहे कारण तिथे महागाई 192 टक्क्याने वाढली आहे. डाॅलरच्या तुलनेत झिम्बाम्वेची करन्सी 72 टक्के घसरली आहे. तसेच, झिम्बाम्वेची करन्सी डाॅलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आहे. त्यामुळे झिम्बाम्वेच्या लोकांनी आपल्या देशाची करन्सी सोडून डाॅलरमध्येच व्यवहार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे झिम्बाम्वेच्या सरकारला भीती आहे की, डाॅलरमध्ये व्यवहार झाल्यास झिम्बाम्वेची करन्सी अधिक कमजोर होईल आणि म्हणूनच हा निर्णय झिम्बाम्वे सरकारकडून घेण्यात आला आहे. आधी संपूर्ण जगात चलनासाठी नाणीच वापरली जायची, त्यामुळे झिम्बाम्वे 2000 वर्षे मागे गेल्याचे दिसून येते. याच निमित्ताने आपण कागदी नोटा कधी चलनात आल्या ते पाहूया.
( हेही वाचा: …..म्हणून भूतान भारताचा हिस्सा बनू शकला नाही! )
खासगी बॅकांनी चलनात आणल्या कागदी नोटा
कागदी नोटा चलनात आल्या तो इतिहास काही फार जुना नाही. 1500 वर्षांपूर्वी जगात देवाणघेवाणीसाठी बार्टर सिस्टमचा वापर केला जाई म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जाई. ( उदा. गहूच्या बदल्यात तांदूळ) त्यानंतर 800 ई.स.पूर्व धातूपासून बनलेल्या नाण्यांचा वापर करण्यात आला. तसेच, 500 इ.स.पूर्व चित्रलिखित नाणी (Punch Marked) चलनात आली. 300 ई.स.पूर्व सोने आणि चांदीची नाणी दळणवळणासाठी चलनात आली. लोक खरेदीसाठी आणि व्यापारासाठी सोने आणि चांदीच्या नाण्यांचा वापर करु लागले. त्यानंतर अनेक वर्षांनी कागदी नोटा चलनात आल्या.
असं मानलं जात की, सर्वप्रथम 13 व्या शतकात कागदी नोटा चलनात आल्या. त्यावेळी चीनने या कागदी नोटा चलनासाठी वापरल्या. पण 15 व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या शतकात पश्चिम यूरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बॅंका विकसित झाल्या. त्यानंतर पहिल्यांदा खासगी बॅंकांनी कागदी नोटा चलनात आणल्या आणि त्यानंतर जगभरात कागदी नोटा चलनात आल्या.
Join Our WhatsApp Community