भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव कायम असताना आता भारताने चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पूर्व लडाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानांचे उड्डाण केल्याबद्दल भारतानं चीनला थेट इशारा दिला आहे.
भारताने सुनावलं
गेल्या काही दिवसांपासून चीनची लढाऊ विमानं पूर्व लडाखच्या सीमेजवळ आगळीक करताना दिसत आहेत. त्यामुळे चीनकडून दगाफटका होऊ नये म्हणून, भारतानं चीनला लडाखच्या सीमेपासून लढाऊ विमानं दूर ठेवायला सांगितले आहे. चीनने तैवानची सर्व बाजूंनी कोंडी केली आहे. त्यातच अमेरिकेच्या स्पीकर नैंसी पेलोसी यांनी केलेल्या तैवान दौ-यामुळे चीनचा संताप वाढला असून चीनने तैवान सीमेजवळील परिसरात सैन्य अभ्यास सुरू केला आहे.
(हेही वाचाः मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी दरेकर ‘पुन्हा आले’! महाविकास आघाडीला धक्का)
लडाख सीमेवर चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी चीनच्या अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत भारताने नाराजी व्यक्त केली. विमानांचा सराव चीनने आपल्या हद्दीत करावा तसेच LAC आणि 10 किमी. सीबीए रेषेचे पालन करावे असंही भारतीय अधिका-यांनी चीनला बजावले आहे.
भारतही तयार
सीमेवर चीनकडून करण्यात येणा-या कारवायांवर भारताची करडी नजर आहे. भारतीय सैन्याकडून पूर्व लडाखच्या सीमेवर विशेष रडार तैनात करण्यात आले आहेत. जर चीनकडून काही दगाफटका करण्याचा प्रयत्न झालाच तर भारतही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असे भारतीय सैन्याकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community