‘या’ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का

137

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये शिंदे गट आणि भाजपला ब-यापैकी यश मिळाले असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावात एकाही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाला आपला झेंडा फडकवता आला नाही.

शिंदे गटाने भोपळाही फोडला नाही

जळगावातील चाळीसगाव,एरंडोल,रावेर अमळनेर या तीन तालुक्यांत झालेल्या 24 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपच्या पॅनलने 6 शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे याठिकाणी शिंदे गटाला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या चिंता वाढल्या असल्याचे बालले जात आहे.

(हेही वाचाः ग्रामपंचायत निवडणुकीत पवारांना शिंदेंचा मोठा धक्का)

शिंदे गटाचे वर्चस्व

राज्यातील इतर ग्रामपंचायतींवर मात्र शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले आहे. औरंगाबाद येथील अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील 3 पैकी 2 ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. नानेगाव आणि जंजाळ या ग्रामपंचायतीत शिंदे गटाला यश मिळाले आहे. तसेच साता-यात शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात तब्बल 22 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्तर तांबवे ग्रामपंचायत शिंदे गटाने जिंकली आहे. तसेच पैठणमध्येही शिंदे गट विजयी झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.