राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता बारा हजारांहून कमी झाली आहे. राज्यात आता केवळ ११ हजार ९०६ कोरोना रुग्ण आहेत. पुढील आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या ९ हजारांपर्यंत येईल, असा अंदाज आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : भाईंदरमध्ये केशवसृष्टीत बिबट्या दर्शन )
शुक्रवारी राज्यात नव्या रुग्णांची संख्या पुन्हा दोन हजारांवर पोहोचली. राज्यात एका दिवसांत २ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्या तुलनेत २ हजार ९९० रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. आता रुग्ण बरे होण्याचा टक्का ९८.०१ टक्क्यांवर सुधारल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
५ कोरोनाबाधितांचा मृत्यू
शुक्रवारी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी २ तर अकोल्यातही एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात पुण्यात ३ हजार १३८, मुंबईत सध्या २ हजार ३९१ तर नागपूरात १ हजार २९४ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. या तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.
० राज्यातील कोरोना मृत्यूदर – १.८३ टक्के
० रुग्ण बरे होण्याचा टक्का – ९.६६ टक्के
० राज्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या – ८० लाख ५५ हजार ९८९
० आतापर्यंत रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ७८ लाख ९५ हजार ९५४
Join Our WhatsApp Community