Indian Railway Job : भारतीय रेल्वे देणार 1.4 लाख नागरिकांना रोजगार

174

भारताची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमध्ये केंद्र सरकार आणखी 1.4 लाख लोकांना रोजगार देणार आहे. पंतप्रधानांच्या 10 लाख नोकऱ्यांच्या घोषणेतंर्गत हा रोजगार दिला जाणार आहे. यासंदर्भात भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली.

( हेही वाचा : 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार की नाही? सरकारने स्पष्टचं सांगितलं… )

1.4 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

यासंदर्भात अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेत 1.4 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. रेल्वेने या वर्षी आतापर्यंत 18 हजार नोकऱ्या दिल्याचे वैष्णव यांनी सांगितले. देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वेचे मोठे योगदान आहे, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, 2014 ते 2022 दरम्यान 3 लाख 50 हजार 204 लोकांची भरती करण्यात आली आहे. केवळ या वर्षात, आतापर्यंत तब्बल 18 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. रेल्वे ही एक मोठी संस्था असल्याने, निवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादींमुळे रिक्त पदे भरणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या, सुमारे 1 लाख 59 हजार 62 पदांसाठी थेट भरती श्रेणीतील रिक्त पदांची भरती विविध टप्प्यांवर आहे, असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच अलीकडे, सुमारे 1.15 कोटी अर्जदारांनी रेल्वे ग्रेड -4 नोकऱ्यांसाठी अर्ज केले, ज्यात ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटलमधील सहाय्यक, लोको शेड, डेपो आणि पॉइंट्समन यांच्यासह इतर लेव्हल1 ग्रेड कॅटेगरीचा समावेश आहे. अशी माहिती, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.