शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मौद्रिक नीती समितीने रेपो दरात वाढीचा निर्णय घेतल्याने, कर्ज महागणार हे निश्चित झाले होते. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. बॅंकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर कोविड काळातील 5.40 टकक्यांपर्यंत पोहचला आहे. या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील ICICI आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने व्याजदर प्रभावी राहणार असल्याचे, बॅकांनी स्पष्ट केले.
ICICI बॅंकेने व्याजदरवाढी विषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ICICI बॅंक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारिक कर्ज दर रेपो दरावर आधारित आहेत. केंद्रीय बॅंकेच्या धोरणानुसार, त्यात बदल होतो. रेपो दरात वाढ झाल्याने, आयसीआयसीआय बॅंकेने कर्जावरील व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के असून, तो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल, असे बॅंकेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 8ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर 7.40 टक्क्यांवरुन 7.90 टक्के करण्यात आला आहे. हा वाढीव दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल. रेपो दरावर कर्जाचे दर अवलंबून असतात.
( हेही वाचा: Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! AC लोकलच्या ८ फेऱ्या वाढणार; पहा वेळापत्रक )
Join Our WhatsApp Community