एसी लोकलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आणखी ८ फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ८ ऑगस्टपासून वातानुकूलित गाड्यांच्या आठ फेऱ्या सुरू होणार आहेत. यामुळे सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज सुरू असलेल्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४० वरून ४८ होणार आहे.
( हेही वाचा : BEST : आता बसमार्ग क्रमांक २१७ चे बसप्रवर्तन रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार)
वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मे पासून ५० टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे AC लोकलला मिळणारा प्रतिसाद वाढू लागला. पूर्वी दिवसाला दीड ते तीन हजार तिकिटांची विक्री होत होती दरात कपात केल्यापासून आता ८ ते ९ हजार तिकिटांची विक्री होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त आठ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
आठ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
अप मार्ग
- विरार-चर्चगेट – सकाळी ७.३० वाजता (जलद)
- बोरिवली – चर्चगेट – सकाळी ९.४८ वाजता (जलद)
- मालाड – चर्चगेट – सायंकाळी – ५.५२ वाजता (जलद)
- भाईंदर – चर्चगेट – सायंकाळी – ७.५२ वाजता (धिमी)
डाऊन मार्ग ( सर्व जलद )
- चर्चगेट – विरार – सकाळी ५.५८ वाजता
- चर्चगेट – बोरिवली – सकाळी ९ वाजता
- चर्चगेट – मालाड – सकाळी १०.४७ वाजता
- चर्चगेट – भाईंदर – सायंकाळी ६.३५ वाजता
तिकीट कमी होणार
दरम्यान, लोकल प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून मुंबईतील एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे भाडे कमी करावे असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने दिला आहे. मुंबईत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या भाडे दरांच्या आधारे हे एसी लोकलचे दर निश्चित करावेत असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community