मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करतो, असे सांगून पुण्यातील एका तरुणीवर एका व्यवसायिकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी अंधेरी पूर्व येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी व्यवसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.
जिग्नेश मेहता (४९) असे अटक करण्यात आलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. घाटकोपर पूर्व येथे राहणारा जिग्नेश मेहता याचा शेअर्स ट्रेडिंग आणि सुका मेवा (ड्रायफ्रूट) चा व्यवसाय आहे. पीडित तरुणी ही पुण्यातील असून ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत प्रमोशनचे काम करते. मागील दोन ते तीन महिन्यापासून ती मुंबईत असताना, पूर्व उपनगरातील एका क्लबमध्ये तीची जिग्नेश मेहता सोबत ओळख झाली होती.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, जिग्नेश हा वारंवार तिच्याशी संपर्कात राहण्याचा आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे, जिग्नेश हा एका नवीन ब्रँडसह ड्रायफ्रूटचा मोठा व्यवसाय सुरू करणार असून तिने त्याच्या नवीन व्यावसायासाठी ब्रँड अॅम्बेसेडर व्हावे आणि तो तीला मॉडेलिंग उद्योगात नाव कमवण्यासाठी मदत करेल असे आश्वासन त्याने तरुणीला देऊन तिला व्यावसायाच्या ब्रँड अॅम्बेसेडरचा करार करण्यासाठी शुक्रवारी अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील एका हॉटेलच्या खोलीत बोलावून घेतले व तिच्यावर बळजबरी करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला, पीडितेने त्याला विरोध करताच त्याने तिला मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
Join Our WhatsApp Community