बेस्ट उपक्रमाचे प्रवासी आणि वीजग्राहक यांना वर्षातून एकदा ‘बेस्ट आमची, काळजी घेते सर्वांची’ या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात आरोग्य तपासणी करता येते. परंतु ही योजना अल्प प्रतिसादाअभावी बंद करण्यात आली आहे. बेस्टने प्रवासी आणि वीजग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना १ मे २०१७ पासून सुरू केली होती.
( हेही वाचा : मेट्रो १ च्या वेळेत वाढ; शेवटची गाडी रात्री पावणे बारा वाजता सुटणार )
बेस्ट आरोग्य तपासणी योजना बंद
‘बेस्ट आमची, काळजी घेते सर्वांची’ या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना बंद करण्यात आल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत बेस्ट बसचा मासिक पास असलेल्या प्रवाशांची रक्तदाब, साखरेची पातळी तसेच त्रैमासिक पासधारक आणि वीज ग्राहकांसाठी हिमोग्लोबीन, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वर्षातून एकदा मोफत नेत्र तपासणी आणि वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी योजनेत ५० टक्के सवलत, बेस्टचे वृत्तसंकलन करणारे बसपासधारक पत्रकार यांच्यासाठी काही वैद्यकीय सुविधा या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आल्या. मात्र ही योजना प्रवाशांपर्यंत तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात उपक्रमाला अपयश आले यामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community