सध्या देशात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अंमलबजावणी संचालनालयाचे छापासत्र (ईडी) सुरु आहे. ईडीला अशा कारवाईत संबंधित आरोपीच्या घराची झडती तसेच तपासात सापडलेल्या किमती ऐवज जप्त करण्याचा अधिकार असतो.
चॅटर्जीच्या घरी काय सापडले?
पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता बॅनर्जीच्या घरातही ईडीने छापे टाकून 50 कोटींहून अधिक किमतींचा ऐवज जप्त केला. त्यात सोने, चांदी आणि अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी, बडे नेते तसेच उद्योगपतींच्या घरी ईडीने कारवाई करुन लाखोंची संपत्ती जप्त केली आहे.
जयललिता यांच्या घरात काय सापडले?
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या घरी 1996 ला प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. त्यात जप्त केलेला ऐवज-
- सोने-29 किलो
- चांदी-800 किलो
- साड्या-11 हजार
- सुवर्णजडित रेशमी साड्या- 750
- शाली- 250
- महागडी घड्याळे-91
- चपला व सॅंडल-750
- एकूण किंमत- 67 कोटी
( हेही वाचा: ‘अशा’ चलनात आल्या ‘कागदी नोटा’ )
26 वर्षे साड्या -चपला पडून
प्राप्तिकर विभागाने हे सामान 2002 साली सरकारकडे जमा केले. नंतर हा खटला तामिळनाडूतून कर्नाटकमध्ये हलवण्यात आला. आता बंगळुरुच्या शहर सिव्हिल कोर्टाच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हे किमती सामान ठेवलेले आहे. हा ऐवज सुरक्षित राहावा यासाठी तिथे 24 तास चार पोलीस तैनात असतात. 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांच्या निधनानंतर ही सर्व अवैध संपत्ती राष्ट्रीय धन म्हणून घोषित करण्यात आली. गेली 26 वर्षे हा किमती ऐवज पडून आहे, याचा लिलाव करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही.
कसा होते लिलाव?
- लिलाव करण्यााधी वस्तूची एकूण स्थिती पाहून तिचे किमान मूल्य निश्चित केले जाते.
- त्यानंतर लिलावासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ठिकाण तारीख आणि वेळ याची माहिती दिली जाते.