पुण्यातील बीजे मेडिकल महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार पुण्यात बीएव्हेरीएंटच्या रुग्णसंख्येत 46 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुण्यात बीए व्हेरिएंट2.75 चे 32 तर बीए व्हेरिएंट 5 चे 14 रुग्ण सापडले आहेत. यासह सोलापूरात बीए व्हेरीएंट 2.75 चा एक रुग्ण आढळला तर अकोल्यातही दोन रुग्णांना बीए व्हेरीएंट 2.75 ची बाधा झाली.
( हेही वाचा : ४० महिलांना लग्नाचे आमिष दाखवून केली आर्थिक फसवणूक; अखेर पोलिसांकडून अटक)
शनिवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीए व्हेरीएंट 5 चे 14 तर बीए व्हेरीएंट 2.75 चे 35 रुग्ण सापडले. गेल्या महिन्यात 20 ते 28 जुलै महिन्यात हे रुग्ण सापडले. यामुळे राज्यात आतापर्यंत सापडलेल्या बीए 4 आणि बीए 5 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 272 आणि बीए 2.75 रुग्णांची संख्या 234 झाली आहे.
नव्या आणि डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येत फारसा फरक नाही
शनिवारी राज्यात 1 हजार 931 नव्या रुग्णांचे निदान झाले. गेल्या 24 तासात 1 हजार 953 रुग्ण घरी बरे होऊन गेले.
9 कोरोनाबधितांचा मृत्यू
मुंबईत 2, नवी मुंबईत एक, अहमदनगर ग्रामीणमध्ये 3, अहमदनगर शहरांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यात आणि गडचिरोलीतही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला
Join Our WhatsApp Community