BEST ची ‘Hop on- Hop off’ बस सेवा आता CSMT वरून सुरू

165

बेस्ट उपक्रम रविवारी ७५ वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे ‘अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून मुंबईकरांसाठी विविध योजना आणण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी ‘होप ऑन – होप ऑफ’ म्हणजेच ‘हो-हो’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना १५० रुपयांत वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून मुंबईभर फिरता येणार आहे.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?)

२०१९ च्या डिसेंबर महिन्यात सर्वसामान्यांना मुंबई दर्शन घडविण्यासाठी बेस्टने लंडनच्या धर्तीवर ‘Hop on- Hop off‘ म्हणजेच हो-हो (Ho Ho) बस सेवा सुरु केली होती. पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले. तसेच यंदा रविवार, ७ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत असून ‘बेस्ट’ उपक्रमातर्फे ‘अमृत महोत्सव’साजरा करण्यात येणार असून ‘होप ऑन-होप ऑफ’ या एसी इलेक्ट्रिक पर्यटन बससेवेचा सुरुवातीच्या थांब्यात बदल केला आहे. तो आता सीएसएमटीपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्याची लांबीही कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या बसचे पर्यटन शुल्क किती असणार

यानुसार, आता या बसेसचा सुरूवातीचा थांबा आता सीएसएमटीच्या बस स्थानकाच्या परिसरातून सुरू होणार आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून दर एका तासाच्या अंतराने पर्यटकांसाठी बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या बसचे पर्यटन शुल्क प्रतिव्यक्ती १५०/- रुपये इतके ठेवण्यात आले आहे. पर्यटकाने एखाद्या पर्यटनस्थळी बसगाडीतून उतरून त्या पर्यटन स्थळाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर पुढच्या फेरीच्या बसगाडीतून पुढील पर्यटन स्थळापर्यंत त्याच तिकिटावर प्रवास करता येईल अशी सुविधा असणार आहे.

कुठे कुठे फिरता येणार

‘हो-हो’ बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार आहे. म्युझियम, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेसकोर्स, धोबी घाट (महालक्ष्मी स्थानक) आणि जिजामाता उद्यानमार्गे जे. जे. उड्डाणपुलावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी ती चालवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.