ठाणे खाडीतील सलग पाचव्या सेटलाईट टॅगिंग केलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याने उंच भरारी मारुन गुजरात गाठला. तब्बल ५०० किलोमीटर अंतर २२ तासांत पार करणारा हा तिसरा खैनगर्जी नावाचा फ्लेमिंगो हा पहिलाच फ्लेमिंगो ठरला. याआधी लेस्टरने ५०० किलोमीटरचे अंतर २५ तासांत पार केले होते.
भारतीय वन्य गाढव अभयारण्य परिसरापर्यंत पोहोचला
लेसर आणि ग्रेटर या दोन प्रजातींच्या अनुक्रमे तीन फ्लेमिंगो पक्ष्यांना सेटलाईट टॅग करुन त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्याच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांना या फ्लेमिंगो पक्ष्यांबाबांच्या गुजरातवारीती ल आकाशातील उड्डाणमार्गाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ठाणे खाडीतील घणसोली येथून तिसरा खैनगर्जी या पूर्ण वाढ झालेल्या ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्याने २ तारखेला आकाशातील उड्डाणाला सुरुवात केली. २२ तासानंतर तिसरा खैनगर्जी लिल्का खाडी परिसरात पोहोचला. आठ तासांच्या विश्रांतीनंतर कच्छच्या छोटे रण या परिसरातील भारतीय वन्य गाढव अभयारण्यात तिसरा खैनगर्जी पोहोचला. याआधीच्या लेस्टर हा ग्रेटर फ्लेमिंगोही भारतीय वन्य गाढव अभयारण्य परिसरापर्यंत पोहोचला होता. सध्या तिसरा खैनगर्जी खारघोडा येथील पटली भागांत वास्तव्यास असल्याचे शास्त्रज्ञांना जीपीएस टॅगिंगच्या माध्यमातून निदर्शनास आले.
Join Our WhatsApp Community