पुणे रेल्वे विभाग २२ ऑगस्टपर्यंत पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व ट्रेन पुन्हा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान, लोकल ट्रेनच्या १३ जोड्या सुरू आहेत. कोरोना महामारीदरम्यान, बंद करण्यात आलेल्या सर्व लोकल गाड्या अद्याप सुरू करण्यात आल्या नव्हत्या. परंतु आता २२ ऑगस्टपर्यंत सर्व ४० जोड्या लोकल ट्रेन टप्प्या-टप्प्याने चालवण्यात येणार आहे.
यासह आणखी चार लोकल ट्रेन ८ ऑगस्टपासून सुरू होणार असून सहा लोकल ट्रेनची सेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर २२ ऑगस्टपासून पुणे-लोणावळा मार्गावरील आणखी ४ लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वे विभागाकडून सांगितले जात आहे.
(हेही वाचा- Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)
पुणे आणि मुंबई दरम्यानच्या गाड्यांप्रमाणे लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या दोन्ही शहरांमधील सर्व स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. पुण्यातून निघणाऱ्या साधारण ९७ टक्के एक्स्प्रेस पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर बंद केलेल्या गाड्या पुन्हा एकदा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.