आता प्रत्येक विजबिलावर तिरंगा; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महावितरणची मोहिम

199

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महावितरणने ऑगस्ट महिन्यातील सर्व वीज बिलांवर हर घर तिरंगाचे स्टिकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवला आहे. मुंबईतला काही भाग वगळला तर, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची वीज आहे. त्यामुळे एकप्रकारे प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याचे काम होत आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

अमृत महोत्सव निमित्त वेगवेगळ्या पातळीवर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. संपूर्ण देश हर घर तिरंगा मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. राज्यात एकूण 2 कोटी 88 लाख 28 हजाराहून अधिक ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती 2 कोटी 15 लाख 43 हजार, वाणिज्यिक 20 लाख 56 हजार, औद्योगिक 3 लाख 96 हजार, तर शेतीपंपाचे 44 लाख 25 हजार ग्राहकांचा समावेश आहे.

( हेही वाचा: दुगारवाडी धबधब्यावर रेस्क्यू ऑपरेशन सुरु; 17 पर्यटकांची सुटका, एक अजूनही बेपत्ता )

अवघ्या काही दिवसांत मोहिम

केंद्र सरकारलाही वीजबिल हे प्रत्येक घराघरांत तिरंगा पोहोचवण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम वाटले. केंद्राकडून निर्देश मिळाल्यानंतर, महावितरणाचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी पाऊले उचलत सर्व वीज बिलांवर तिरंगा लावण्याचे ठरवले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.