बेस्टची ‘चलो पे’ सेवा

141

प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सेवासुविधा पुरवण्यासाठी बेस्ट नवे उपक्रम सातत्याने राबवत असून, आता अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत बेस्ट उपक्रमाने इंडियाज फर्स्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट फोकस पेमेंट सिस्टीमवर भर दिला आहे. याचे  नाव चलो अॅप असे असून, हे बेस्ट चलो अॅपवर उपलब्ध आहे. डिजिटल तिकीट प्रणाली अंतर्गत या उपाययोजना केल्या जात असून, प्रवाशांना अधिकाधिक दिलासा देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात आहे.

बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, वापरकर्ता प्रवाशांना युपीआय, नेट बॅंकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, ऑनलाईनद्वारे मोबाईल वाॅलेट रिचार्ज करता येईल. याद्वारे त्यांना बेस्टच्या वाहकांकडून आपले तिकीट घेता येईल. यासाठी प्रवाशांना प्ले स्टोअरवरुन बेस्ट चलो अॅप इन्स्टाॅल करावे लागणार आहे. अधिकाधिक प्रवाशांनी डिजिटल प्रणालीचा वापर करावा, यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा बेस्टने केला आहे.

( हेही वाचा: Maharashtra TET Scam: टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची प्रमाणपत्रे रद्द; सत्तार म्हणतात… )

खरेदीसाठीही वापर करता येणार

आता कार्यान्वित करण्यात आलेली यंत्रणा भविष्यात आणखी अपडेट करण्यात येणार आहे. त्यानुसार त्याचा वापर दुकानांसह व्यापार खरेदीसाठीदेखील करता येणार आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रवास सक्षम करणे हा उद्देश बेस्टचा असून, आतापर्यंत 23 लाख प्रवाशांनी बेस्ट चलो अॅप डाऊनलोड केल्याचा, दावा केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.