राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून, नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत तब्बल ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे.
कोणत्या फाईल्सचा आहे समावेश
विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर आणावयाचे प्रस्ताव, नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा यात समावेश आहे.
(हेही वाचा – आमदारांना फोन गेले, पण मंत्रिमंडळ समावेशाबाबत निरोप नाहीच!)
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची, तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत; तसेच लोकांची कामे अडणार नाहीत, यादृष्टीने कारभार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community