महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट

126

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 11 ऑगस्टपर्यंत राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील 24 तासात डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. तसेच कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसाठीही ८, ९ आणि १० ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबत हवामान खात्याने नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

( हेही वाचा : CWG 2022 : एकाच दिवसात सुवर्ण पदकांचा चौकार! कॉमनवेल्थ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी)

रेड अलर्ट

पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड पुणे, कोल्हापूर, सातारा आणि गडचिरोली

ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग, मुंबई, नाशिक, नांदेड, हिंगोली, परभणी, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर

यलो अलर्ट

नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, लातूर यासोबतच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.