रशियातील एल ब्रूस या ५७४२ मीटर शिखरावर चढाई करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे प्रणीत शेळके येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी रशियाला रवाना होत आहेत. एल ब्रूस हे रशियातील सर्वात उंच शिखर आहे. शेळके हे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत भारतीय चमूमध्ये एकूण चारजण आहेत. त्यांना शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मादाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी फडकवलेला वंदे मातरम हा ध्वज देऊन त्यांच्या मोहीमेला शुभेच्छा दिल्या. यावेळी वीर सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर हे सुद्धा उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community