भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI)ग्लोबल टी-20 टुर्नामेंटमध्ये जाण्यास भारतीय संघाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पहिलाच सामना जो पाकिस्तानसोबत खेळला जाणार होता, तो खेळता येणार नाही. भारतातील बंगाल क्रिकेट टीमला BCCI ने स्पर्धेसाठी जाण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे बंगाल संघाने या स्पर्धेतून आपलं नावं मागे घेतलं आहे. बीसीसीआय आपल्या पुरुष खेळाडूंना परदेशातील टी-20 स्पर्धांमध्ये परवानगी देत नाही. त्यामुळे बंगालच्या संघाला परवानगी नाकारण्यात आली आहे.
( हेही वाचा: संजय राठोडांनी शपथ घेताच चित्रा वाघ यांनी केलं पहिलं ट्वीट; म्हणाल्या हे अत्यंत दुदैवी …)
पाकिस्तानी संघाविरुद्ध होणार होता सामना
नामिबियात होणा-या या स्पर्धेत बंगालचा संघ नामीबिया, पाकिस्तान सुपर लीगची टीम लाहोर कलंदर्स आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक संघाविरुद्ध खेळणार होता. 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे. आता बंगालने या स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. सीएबीने22 जुलैला आपल्या संघाची घोषणा केली होती.
Join Our WhatsApp Community