गेल्या दोन महिन्यांत तांदळाच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. बासमतीच्या विविध प्रकारांत दहा ते पंधरा रुपये, कोलमच्या दरात सात- आठ रुपये, आंबेमोहरच्या दरात दहा रुपये आणि बासमती तुकडा- कणीच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत.
ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर्स असोसिएशन ने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश हा भारताकडून नियमित तांदूळ आयात करणारा देश नाही. तरीही यंदा बांगलादेशने आपल्याकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केला आहे. बांगलादेशातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथे भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बांगलादेश आपल्याकडून तांदूळ खरेदी करत आहे. त्यासाठी बांगलादेश सरकारने तांदळावरील आयात शुल्क 65 वरुन 25 टक्क्यांपर्यंत घटवले आहे.
( हेही वाचा: रिझर्व्ह बॅंकेने ‘या’ बॅंकांना ठोठावला दंड; ‘हे’ आहे कारण )
चीनचीही भारताकडून आयात सुरु
जगात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते. तरीही चीन सध्या आपल्याकडून तांदळाची आयात करत आहे. चीन आपल्याकडून अख्या तांदळाऐवजी तुकडा तांदूळ खरेदी करत आहे.
Join Our WhatsApp Community