शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अखेर आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला. यावेळी शिंदे गटाचे 9 तर भाजपकडून 9 अशा एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता शपथविधीनंतर कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार झालं पण खातेवाटप कधी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा- माझा मुलगा LLB करतोय तरी त्याचं नाव TET घोटाळ्याच्या यादीच कसं? सत्तारांचा सवाल)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
कॅबिनेटचा विस्तार आज पार पडला. आजपासूनच हे मंत्री पूर्ण क्षमतेनं काम सुरु करतील. तसेच लवकच ते आपापल्या खात्यांचा पदभार स्विकारतील. हे छोट मंत्रिमंडळ असून उर्वरित विस्तार अद्याप बाकी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
Cabinet expansion took place today. Starting today, they will work full-fledged & take up the responsibility of their respective depts. The rest of the cabinet still remains (to be formed). It's a small cabinet, the rest of the cabinet still remains (to be formed): Maharashtra CM pic.twitter.com/XwZIFqdzup
— ANI (@ANI) August 9, 2022
कोणाला मिळणार कोणतं पद
राजभवनात मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या ९ तर भाजपाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान, महत्त्वाची खाती भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये गृहमंत्री आणि अर्थ खातं फडणीस, महसूल खातं राधाकृष्ण विखे-पाटील, ऊर्जा खातं सुधीर मुनगंटीवार, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी उद्योग खातं उदय सामंत यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथ विधीनंतर खाते वाटपाबाबत चर्चेसाठी किती वेळ लागतो, किती दिवसात खातेवाटप जाहीर कधी केले जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community