उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग आजही फेमस आहे. माझ्या या विधानावरुन माझी अनेकांनी टिंगल केली असल्याचे खुद्द फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात सांगितले आहे. पण मंगळवारी पुणे विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी एक मिश्कील विधान केले आहे.
पुणे विद्यापीठाकडून आज़ादी का अमृतमहोत्सवानिमित्त एक विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुणे विद्यापीठाच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठाचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
(हेही वाचाः ‘हा आक्षेप लवकरच दूर होईल’, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांचे मोठे विधान)
काय म्हणाले फडणवीस?
पुणे विद्यापीठाने ज्यावेळी वृक्षारोपणाचा गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला त्यावेळी मी मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, आता दुसरा रेकॉर्ड होत असताना मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो आहे पण तिसरा रेकॉर्ड कराल तेव्हा मी येणार नाही, असे मिश्कील विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
भारत भविष्यात विश्वगुरू हाईल
या अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी आणि देशाशी विद्यार्थ्यांना जोडले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रमाने ओतप्रोत अशा तरुण पिढीपुढे स्वातंत्र्याचे ध्येय्य होते. त्यानंतरच्या पिढीसमोर देशाला स्वयंपूर्ण करण्याचं ध्येय्य होतं. पण आताच्या पिढीकडे प्रचंड क्षमता आहे. त्यामुळेच भारत भविष्यात विश्वगुरू होऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः शिंदेंकडे नगरविकास, फडणवीस गृह आणि अर्थ मंत्रालयाचे कारभारी?)
Join Our WhatsApp Community