शिवसेनातील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांकडून धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हावर अधिकारासाठी योग्य कागदोपत्री पुरावे सादर करण्याकरता उद्धव ठाकरे गटाला 4 आठवड्यांचा अवधी दिला आहे.
एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील निवडणूक चिन्हाचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्याबाबत निकाल येईलपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, पक्षाच्या चिन्हावर निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला होता. आता निवडणूक आयोगानेही शिवसेनाला मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली होती. आता ही मुदत वाढवली असून येत्या 4 आठवड्यात पुरावे सादर करण्यास सांगितले आहेत.
( हेही वाचा: सत्तेसाठी सोयीने राजकीय भूमिका बदलणारे नितीश कुमार-शरद पवार एकाच माळेचे मणी )
Join Our WhatsApp Community