शिंदे सरकारविरोधात राष्ट्रवादी दाखल करणार याचिका; निवडणुका वेळेत घेण्याची मागणी

159

शिंदे सरकारच्या विरोधात बुधवारी राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्याची मागणी या याचिकाद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. न्यायालयाने सांगूनही सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे.

‘ही’ आहे राष्ट्रवादीची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या वेळेवर घेतल्या जाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल होणार असून, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात, असे न्यायालयाचे आदेश असताना देखील या निवडणुकांना विलंब होणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणात बुधवारी याचिका दाखल केली जाणार आहे.

( हेही वाचा: सत्तेसाठी सोयीने राजकीय भूमिका बदलणारे नितीश कुमार-शरद पवार एकाच माळेचे मणी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.