वर्क फ्रॉम होमने घरपण गेले म्हणून बविआने  ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ आणले 

337

मुंबई – लोकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ लोक घरातूनच कार्यालयातील कामे करत आहेत. त्यामुळे घराचे घरपण निघून गेले आहे. घरातून कार्यालयीन कामे करत असताना  ना धड घरातील मंडळींना वेळ देता येत ना धड ऑफिससारखे काम करणेही शक्य होत. ऑफिसमध्ये बसून काम केल्याने कामे वेळेत आणि व्यवस्थित पार पडतात. म्हणून बहुजन विकास आघाडीने वसई-विरार या भागातील नोकरदारवर्गाला पक्षाची ठिकठिकाणची कार्यालये कार्यालयीन कामासाठी वापरण्याकरता देण्याची संकल्पना मांडली आहे, ज्याला ‘वर्क फ्रोम्म माय ऑफिस’ असे नाव देण्यात आले आहे, असे बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी हिंदुस्थान पोस्ट सोबत बोलताना सांगितले.

वसई-विरारमधून मुंबईत एसटीमधून ८ तास प्रवास करत कामावर ये-जा करावी लागत आहे. हा त्रास दूर व्हावा याकरता हि संकल्पना आहे. या संकल्पनेनुसार नालासोपारा, वसई आणि विरार या भागातील नोकरदार वर्गाला  बहुजन विकास आघाडीच्या विविध कार्यालयांमध्ये बसून ऑफिसचे काम करणे शक्य होणार आहे. या ठिकाणी ऑफिससारखे वातावरण मिळेल. इथे टेबल-खुर्चीबरोबरच गरज पडल्यास कम्प्युटरची व्यवस्था केली जाईल. त्याशिवाय वायफाय सेवा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत उपलब्ध असेल. नेहमीच्या ऑफिसच्या वेळेत ही सेवा लोकांसाठी उपलब्ध असेल. लोक त्यांच्या वेळेत येऊन इथे बसून काम करू शकतील, असेही आमदार क्षितिज ठाकूर म्हणाले.

कुठे आहे वर्क ऑफ माय ऑफिस

जुनं विवा महाविद्यालय, नवीन विवा महाविद्यालय, नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी भवन  या तीन इमारतींमध्ये ऑफिससारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात गरज पडल्यास आणखी काही ठिकाणी ऑफिसेस सुरु करण्यात येणार आहे.

चहा, नाश्ता आणि जेवणही मिळणार 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे फक्त वायफायची व्यवस्थाच नाही तर तिथे येणाऱ्यांना चहा-पाणी, नाश्ता आणि जेवणाची देखील व्यवस्था केली जाईल असे आमदार क्षितीज ठाकूर यांनी सांगितले. तसेच या सर्वाचा खर्च ते स्वखर्चातून करणार आहेत. एवढेच नाही तर जोवर लोकल सेवा सुरुळीत होणार नाही तोवर वर्क फ्रॉम माय ऑफिस ही संकल्पना सुरु राहणार असे देखील त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात आणखी काही ठिकाणी कार्यालये सुरु करावी लागली तरी ती देखील करू असे देखील क्षितीज ठाकूर म्हणालेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.