MSRTC: एसटी बसची दोन चाकं निघाल्याने चालकाची उडाली भंबेरी! एक चाक थेट नदीत अन्…

159

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एसटी आगाराची बस गडचांदूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक एसटी बसची मागील दोन चाक निघाली आणि ते नदीत पडले. मात्र या बसच्या चालकाने प्रसंगवधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. बस चालकाने बस अचनाक थांबवल्याने मोठा अपघात टळला. या बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. ही घटना मंगळवारी दुपारी चारगावजवळ घडल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा- नाशिकमध्ये पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू!)

दरम्यान, आतापर्यंत एसटीचे अनेक अपघात झाले परंतु हा झालेला अपघात विचित्र असल्याचे म्हटले जात आहे. कारण एसटी बसची चाकं अचानक निघाल्याने चालकाची भंबेरी उडाली. मात्र चालकामुळे प्रवाशांचा जीव वाचला असून ते सुखरूप आहे. सध्या या बसची तपासणी करण्यात येत आहे. चारगाव ते गडचांदूरपर्यंतच्या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा प्रकार घडला तेव्हा रस्त्याच्या शेजारी नदी होती, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वणीवरून गडचांदूरला बस क्रमांक एम एच ४०-८९५३ जात होती. या बसमध्ये साधारण १८ प्रवासी होते. तसेच गडचांदूरला जात असताना मध्ये लागणाऱ्या नदीच्या पुलावर चालत्या बसची मागील दोन चाकं निघाली. यातील एक चाक नदीत पडले. तर दुसरे चाक रस्त्यात निखळल्याने बस जागीच थांबली. यावेळी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून गाडीत आरडा ओरड , गोंधळ सुरू झाला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.