भारताचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा या दोघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून कौतुक केले आहे. जडेजा पती-पत्नीने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त वंचित मुलींना मदत करण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. याची दखल घेत, पंतप्रधानांनी जडेजा दाम्पत्याचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांनी जामनगर पोस्ट ऑफीसमध्ये 101 सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. हा उपक्रम त्यांनी त्यांची मुलगी कुंवारीबाश्री निध्यना हिच्या 5 व्या वाढदिवसानिमित्त केला आहे.
https://twitter.com/imjadeja/status/1556657099756675076?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556657099756675076%7Ctwgr%5E4d5978100df7109e9db98f37a5eea7556b74830d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.hindustantimes.com%2Fsports%2Fpm-narendra-modii-praises-ravindra-jadeja-wifes-initiative-to-open-101-sukanya-smriddhi-accounts-141660043139012.html
काय लिहिलंय पत्रात
जडेजा दाम्पत्याच्या या दिलदारपणाचे आणि समाजकारणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पोस्ट ऑफीसमध्ये तुम्ही वंचित मुलींसाठी 101 सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. तुमचा निर्णय खूपच कौतुकास्पद असून, यामुळे मला आनंद झाला. तुमची मुलगी निध्यना हिचा 5 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक खात्यात सुरुवातीची रक्कम जमा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी योगदान देत राहा. अशा स्वयंसेवी प्रयत्नांमुळे समाजात एक सकारात्मक संदेश निर्माण होईल आणि सर्वांना प्रेरणा मिळेल”
( हेही वाचा: श्रीमंत घरांमध्येही छळ; हुंडा प्रकरणात उच्च न्यायालयाचे निरीक्षण )
या पत्रानंतर रवींद्र जडेजाने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. जडेजाने ट्वीट करत, पंतप्रधान मोदींसह गुजरात राज्याचे दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांचेही आभार मानले आहेत.
https://twitter.com/imjadeja/status/1534483158703427586?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1534483158703427586%7Ctwgr%5E4d5978100df7109e9db98f37a5eea7556b74830d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.hindustantimes.com%2Fsports%2Fpm-narendra-modii-praises-ravindra-jadeja-wifes-initiative-to-open-101-sukanya-smriddhi-accounts-141660043139012.html
Join Our WhatsApp Community