भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले शरद पवारांचे दुःख थोडे वेगळे आहे. ते सर्वांना माहिती आहे.
काय म्हणाले फडणवीस
आमचा जो मित्र पक्ष आहे त्यांच्या सोबत ५० लोकं आहेत. आम्ही ११५ लोकं असून मित्रपक्षाला आम्ही मुख्यमंत्री पद दिले आहे. मंगळवारी त्यांचे नऊ आणि आमचे नऊ अशा एकूण १८ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पवार साहेबांचे दुःख जरा वेगळं आहे, असे मला वाटते.
(हेही वाचा – Covid-19 नंतर चीनमध्ये ‘या’ नव्या व्हायरसचा धुमाकूळ; 35 जणांना लागण, कोणती आहेत लक्षणं?)
यासह पुढे पक्ष चिन्हावरील वादाच्या पवारांच्या वक्तव्यावर फडणीस म्हणाले, ज्यावेळी पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. त्यावेळी डिफेक्शनचे कायदे नव्हते. त्यामुळे कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. मात्र आज यासंदर्भातील कायदे तयार झाले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते. यासर्वावर शिंदे कायदेशीर लढाई करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले शरद पवार
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून भाजपला मोठा धक्का दिला आहे. या सर्वामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो असे वक्यव्य शरद पवारांनी केले आहे. तर वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भजपाने आघात केला. भजपा मित्रपक्षांना दगा देते हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या काडीमोडवर पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
Join Our WhatsApp Community