भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर जेडीयूने पुन्हा आरजेडीशी संसार थाटला आहे. यानंतर बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे. यावेळी नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी झाला.
(हेही वाचा – “…त्यांना दुसऱ्या पक्षांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, शेलारांचा पलटवार)
बुधवारी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दोघेही राजभवनावर पोहोचले. या ठिकाणी राज्यपाल फगू चौहान नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली असून ते दुसऱ्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. या शपथ विधी सोहळ्याला राबडी देवी, तेजप्रताप यादव, जीनत रामन मांझी हे देखील उपस्थित होते.
पटना: बिहार के राज्यपाल फागू चौहान ने नीतीश कुमार को राजभवन में बिहार के मुख्यमंत्री पद की शपथ दिलाई। pic.twitter.com/Gb1JRsTuin
— ANI_HindiNews (@AHindinews) August 10, 2022
शपथविधीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, भाजप सोडण्याचा निर्णय पक्षाने एकत्रितपणे घेतला आहे. सन २०२४ पर्यंत पदावर राहिल किंवा नाही हे सांगू शकत नाही. त्यांना काय बोलायचंय ते बोलू शकतात. तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे कुटुंबीय म्हणाले, बिहार माझं कुटुंब आहे. मी सर्वांचे आभार मानते, असे तेजस्वी यांच्या पत्नीने म्हटले. बिहारसाठी ही चांगली गोष्ट घडली. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांनी म्हटले आणि आम्ही काम करण्यासाठी सत्तेत आलो आहोत असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.
Join Our WhatsApp Community