एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या हातातून एकेक बाब निसटत चालली असताना, आता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीतूनही उद्धवसेना बेदखल झाली आहे. अजय चौधरी यांनी पत्राद्वारे केलेली शिफारस विधिमंडळ सचिवांनी फेटाळून लावली असून, शिंदे गटातील दोघा सदस्यांना मात्र या समितीवर घेण्यात आले आहे.
( हेही वाचा : …तर कायदेशीर पावले उचलीन; संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा )
ठाकरे गटातील एकाही सदस्याची निवड नाही
अधिवेशनाची तारीख, ठिकाण आणि अन्य महत्त्वाच्या बाबींसदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती निर्णय घेत असते. या समितीत प्रत्येक पक्षाच्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र बैठकीला काही तास शिल्लक राहीले असताना, शिवसेनेच्या ठाकरे गटातील एकाही सदस्याची या समितीवर निवड केली नसल्याने त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय उद्धव गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी यासंदर्भात विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहित, ही कृती नियमबाह्य व बेकायदा असल्याचा आरोप केला. तसेच आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींना या समितीत स्थान देण्याची मागणीही केली होती.
मात्र, उद्धव गटाची शिफारस फेटाळून लावत विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेतर्फे दादा भुसे आणि उदय सामंत नियुक्ती जाहीर केली. या निर्णयामुळे अजय चौधरी यांच्या गटनेतेपदावरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community