अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर अन्न आणि औषध प्रशासन विभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एक मोहिम हातात घेतली आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत या विभागाने नाशिकमधील नायगाव परिसरातील खाद्यतेल गोदामावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत 1 कोटी 10 लाख रुपयांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला आहे. भेसळयुक्त तेल आणि तेलावरील लेबलमध्येही दोष असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या या तेलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासानंतर, याबाबत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मागच्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काही दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गुळाच्या गोदामावरदेखील छापा टाकला होता.
( हेही वाचा: IAF Agniveer Result 2022: अग्निपथ योजना 2022 चा निकाल जाहीर; असा करा चेक करा निकाल )
Join Our WhatsApp Community