D.N नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेलली सात वर्षांची मुलगी तब्बल 9 वर्षांनंतर सापडल्याची घटना ताजी असतानाच हरवलेल्या अल्पवयीन मुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात दररोज सरासरी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता होतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु दिलासादायक बातमी अशी की हरवलेली मुले सापडण्याचे प्रमाणही जास्त आहे.
राज्याच्या तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर हरवलेल्या मुलांचा शोध घेणा-या विभागाकडूनही जोरदार प्रयत्न सुरु असतात हे ट्रॅकचाइल्ड या संकेतस्थळावरील आकडेवारीवरुन दिसून येते. गेल्या 24 तासांत राज्यात 16 मुले हरवली. परंतु त्याच वेळी याच काळात 100 मुले सापडली. गेल्या वर्षभरात 896 मुले हरवली आहेत. मात्र त्याचवेळी आतापर्यंत हरवलेल्या मुलांपैकी 2 हजार 205 मुले सापडली आहेत. याचाच अर्थ असा की, दररोज सरासरी दोन ते तीन मुले हरवतात तर 6 मुले सापडतात. ट्रॅकचाइल्ड हे संकेतस्थळ केंद्रीय महिला आणि बालविकास विभागाने विकसित केले आहे. प्रत्येक राज्यातील हरवलेली मुले आणि व्यक्तींची नोंद दररोज ठेवली जाते. मुंबई पोलिसांचा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा स्वतंत्र विभाग आहे.
( हेही वाचा: मुंबई ते चेन्नई प्रवास होणार सुसाट… )
Join Our WhatsApp Community