राज्यातील नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यामध्ये शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यावर बोलताना संजय राठोड यांना मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्याय केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शहाजीबापू
राजकारणात अनेकदा नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत असतात. संजय राठोड यांच्यावर जे आरोप झाले होते, त्याप्रकरणी पोलिसांना त्यांना क्लिनचीट दिली आहे. एखादा आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्याला क्लीनचीट दिली असेल तर त्याचं राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कोणालाच नाही. एकनाथ शिंदेंनी राठोड यांच्याबाबत जो निर्णय घेतला तो न्याय देणारा आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
(हेही वाचा – बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, ‘त्यांना लवकरच…’)
यासह ते पुढे असेही म्हणाले की, शिंदे गट आणि शिवसेना असा न्यायालयीन वाद सुरू असताना शहाजीबापू पाटील यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे देखील आम्हालाच मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यघटनेप्रमाणे ज्याच्याकडे बहुमत असते त्या गटालाच हे चिन्ह मिळते. त्यामुळे आमच्याकडे बहुमत आहे, म्हणून आम्हालाच ते चिन्ह मिळणार..सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने लागणार आहे, असेही शहाजीबापू म्हणाले.
Join Our WhatsApp Community