गेल्या एक ते दीड महिन्यांनंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. यामध्ये शिंदे गटासह भाजपच्या प्रत्येकी ९ मंत्रीच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकही महिला नसल्याने टीका देखील करण्यात येत आहे. अशातच अनेक नेत्यांना संधी न मिळाल्याने भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री होण्याइतकी माझी पात्रता नसेल, त्यामुळे पक्ष नेतृत्वाला जेव्हा वाटेल की माझी पात्रता आहे तेव्हा मला मंत्रीपद देतील, अशी प्रतिक्रिया दिली. यावरच भाजपच्या गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले महाजन
मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला असला तरी पावसाळी अधिवेशनपूर्वी खाते वाटप होणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने नाराज असलेल्या पंकजा मुंडेंबाबत विचारणा केली असतान ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना मोठं पद मिळणार आहे. पक्षश्रेष्ठी विचार करतील असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – ‘मंत्रीपदासाठी माझी पात्रता…’, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया)
यासह खाते वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराला नक्कीच वेळ लागला. मात्र आता खाते वाटपाला उशीर होणार नाही. स्वातंत्र्य दिनासाठी आम्हाला सर्वांना झेंडावंदन करण्यासाठी जिल्हा वाटप करून दिला आहे. खाते वाटपासाठी आता निश्चित असे काही सांगता येणार नाही. शपथविधी झाला असून १७ ऑगस्टला अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी खाते वाटप होऊ शकते. कारण, अधिवेशनामध्ये मंत्र्यांना त्या विभागाशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरं देखील द्यावी लागणार आहे. तसेच त्याचा अभ्यासह करावा लागणार असल्याने मला नाही वाटतं की खाते वाटपाला जास्त उशीर होईल.
Join Our WhatsApp Community