मराठी भाषेच्या समृद्धीसाठी राज्य सरकारने भाषा संचालनालय कार्यालयाची सुरुवात केली खरी, मात्र गेल्या 20 वर्षांपासून कार्यालयाचे भाषा संचालकपद सरकारला भरता आलेले नाही. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हे पद भरण्यासाठीचे आश्वासन दिल्यानंतरही नोकशाहीने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला आहे. त्यानंतर तीन मुख्यमंत्री आले, गेले पण हे पद भरण्यासाठी एकही व्यक्ती मराठी भाषा विभागाला मिळालेली नाही.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या विकासासाठी भाषा संचालनालय हे कार्यालय स्थापन केले. एकेकाळी डाॅक्टर वा.ना. पंडित, शं.ना.नवरे, डाॅ. वा.ल.कुलकर्णी, डाॅ. य.शं.कानिटकर यांसारख्या भाषातज्ज्ञांनी हे पद भूषवले. या काळात विविध विषयांचे कोश व परिभाषा कोश यांची निर्मीती करुन मराठी भाषेचे दालन समृद्ध करण्यात आले . मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये परिभाषा कोश निर्मीतीची व अनुवादाची कामे ठप्प आहेत.
( हेही वाचा: सांगलीत पुराचा धोका: कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ,नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर )
प्रस्तावावर अद्याप निर्णय नाहीच
तत्कालीन मराठी भाषा मंत्र्यांसमोर उच्चविद्याविभूषित व्यक्तीचा भाषा संचालक पदावर प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव व अर्ज होता. भाषा संचालक पदावर सेवानियमानुसार, भाषा संचालक पदावर प्रतिनियुक्ती देण्यासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता व अनुभव असेलल्या, प्रथितयश महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन, संशोधन कार्यानुभव असलेल्या व्यक्तीचा प्रस्ताव दोन वर्षे भाषा विभागाने बासनात गुंडाळून ठेवला आहे.
Join Our WhatsApp Community