रक्ताचा वारस म्हणून राजकीय वारस नसावा! आदित्य ठाकरेंवर केसरकरांचा हल्लाबोल

132

सध्या एकजण महाराष्ट्र भर फिरत आमच्यावर आराेप करत आहे, परंतु त्यांनी कार्यर्त्यांच्या भावना अद्याप जाणलेल्या नाही. महाराष्ट्राचे प्रेम रक्तात असावे लागते. रक्ताचा वारस म्हणून राजकीय वारस नसावा, तो कौतुकाचा, विचारांचा वारसा असला पाहिजे, या शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाव न घेता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

आमच्या विरोधात ८ जागा निवडून दाखवा 

आम्ही सर्वसामान्य जनता असून केवळ काम करुन दाखवू शकताे. संभाजीराजे, उदयनराजे यांना भेटल्यावर त्यांचे विचार लाेकांना राेजगार उपलब्ध करुन देण्यासाठी झटत असल्याचे जाणवते. शिवसेना म्हणजे कार्यरत असलेले सैनिक…जाेपर्यंत सेना साेबत नाही तर त्याला शिवसेना कसे म्हणणार. आमच्यासाेबत कार्यकर्त्यांची फळी असून ती एकनाथ शिंदे यांनी विचारपूर्वक उभारली गेली आहे. आम्हाला किमान एक वर्ष काम करण्याची संधी द्या. आमच्या विराेधात आठ जागा जरी विराेधकांनी निवडून आणल्या तर आम्ही सक्षम नाही असे म्हणू, असेही केसरकर म्हणाले.

(हेही वाचा शिंदे गटाच्या जागोजागी उभ्या होणार प्रती शाखा )

स्वप्नपूर्ती करण्याचा प्रयत्न 

छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पुण्यातील विश्रामगृहात भेट घेतली. यावेळी केसरकर हे पर्यटन मंत्री व्हावेत असा आमचा आग्रह आहे, असे वक्तव्य संभाजीराजे यांनी केले. याप्रसंगी केसरकर म्हणाले, आपला गाैरवशाली इतिहास आहे. ताे जगासमाेर गेला पाहिजे. जे पर्यटनमंत्री राज्याचे हाेतील त्यांच्या समवेत राज्याचा इतिहास सर्वदूर पाेहचण्यापर्यंत प्रयत्न केले जातील. संभाजी राजे आणि उदयनराजे हे दाेघे देवाच्या कृपेने पुण्यात भेटले. त्यामुळे नवीन ऊर्जा घेऊन पुढील कामास मी जाताे. जनतेला केवळ आश्वासन देण्यापेक्षा स्वप्नपूर्ती करण्याचा प्रयत्न आगामी काळात करण्यात येईल. मराठा आंदाेलनातील खटले मी गृहराज्यमंत्री असताना मागे घेतले हाेते. मराठा समाजासाठी संभाजीराजे काम करत असून त्यांचे आशिर्वाद घेऊन रायगड विकासासाठी प्रयत्न करणार आहे. विचारांची प्रगल्भता संभाजीराजे यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून मिळाली आहे, असेही केसरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.