भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला दुप्पट परतावा मिळू शकतो. या योजनेविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे…
( हेही वाचा : तुमचाही स्मार्टफोन हरवलाय? ‘बेस्ट’ने जारी केली गहाळ झालेल्या फोनची यादी!)
भारतीय पोस्ट किसान विकास पत्र योजना म्हणजे काय?
- या योजनेत गुंतवणूक केल्यास ठेवीदाराला त्याच्या गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो. जर तुम्ही या योजनेत १० वर्षे आणि ४ महिन्यांसाठी म्हणजेच एकूण १२४ महिन्यांसाठी गुंतवणूक केली तर तुमची रक्कम दुप्पट होईल.
- यातील बचतीवर सध्या वार्षिक ६.९ टक्के व्याजदर उपलब्ध आहे. हा व्याजदर १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आला आहे. या योजनेतील व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ पद्धतीने दिले जाते.
अकाऊंट ओपन करण्यासाठी प्रक्रिया…
- भारतीय पोस्टाच्या किसान विकास पत्र (KVP) या योजनेत किमान १००० रुपयांच्या गुंतवणुकीसह कोणीही गुंतवणूक करू शकते. जर तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला यासाठी पॅन कार्ड द्यावे लागेल. या अंतर्गत तुम्ही जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊन खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला सरकारी ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे देणे बंधनकारक आहे.
- या योजनेअंतर्गत भारतातील कोणताही प्रौढ नागरिक खाते उघडू शकतो. यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही या अंतर्गत अनिवासी भारतीयांना पात्र मानले जात नाही.
दुप्पट परतावा मिळणार?
- जर तुम्हा या योजनेत दरवर्षी १ हजार रुपये गुंतवले, तर तुम्हाला ६.९ टक्के व्याजदर दिला जातो. पहिल्या वर्षी कोणताही परतावा लागू नाही.
- मॅच्युरिटीनंतर तुमचे गुंतवणुकीचे पैसे दुप्पट होतील.
- या योजनेअंतर्गत खातेदाराच्या मृत्यूनंतर संपूर्ण पैसे नॉमिनी किंवा कुटुंबातील सदस्याला दिले जातात.