आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक खातेधारक बँकेतून कर्ज घेत असतात. या कर्जाचे हप्ते कर्जधारकांना ठरवून दिलेल्या वेळेत भरावे लागतात. हे हप्ते कर्जदारांनी चुकवले तर, ते वसूल करण्यासाठी बँकांकडून रिकव्हरी एजंटची मदत घेण्यात येते. त्यामुळे हे एजंट कर्जदारांना अनेकदा कॉल करुन त्रास देतात. पण आता याची गंभीर दखल RBI कडून घेण्यात आली आहे. अशा पद्धतीने वेळी अवेळी कॉल करुन कर्जधारकांना त्रास देणा-यांवर कारवाई करण्यासाठी आरबीआयकडून पावले उचलण्यात आली आहेत.
नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, अनुसूचित बँका आणि इतर बँकांसाठी कर्ज वसुली संदर्भात आरबीआयकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
असे आहेत नियम
- बँक रिकव्हरी एजंट्सनी कर्जवसुली करताना त्यांच्या कर्जधारकांना धमकावून त्यांना त्रास देऊ नये. तसेच कर्जवसुली करण्यासाठी फोनवर कॉल करू नये
- वसुली करण्यासाठी कर्जदारांना कॉल करताना वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. या वेळेतच बँकांच्या रिकव्हरी एजंटने कर्जदारांशी संपर्क करणे बंधनकारक आहे
कारवाई होणार
याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारपासून लागू करण्यात आल्या आहेत. तसेच याचे पालन न करणा-या बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय देखील आरबीआयने घेतला आहे. कर्जदाराने याबाबतची तक्रार सगळ्यात आधी आपल्या बँकेकडे करावी. त्यानंतर बँकेकडून या तक्रारीची दखल घेणे आवश्यक आहे. 30 दिवसांच्या आत या तक्रारीचे संबंधित बँकेकडून निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे याबाबतची तक्रार करता येईल. रिझर्व्ह बँकेकडेही याबाबतची तक्रार करता येऊ शकते. आरबीआयकडून संबंधित बँकेला रिकव्हरी एजंटवर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले जाऊ शकतात.
Join Our WhatsApp Community