नुपूर शर्माच्या हत्येचा कट उधळला; जैश-ए-महंमदचा अतिरेकी अटकेत 

124

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट उत्तर प्रदेशच्या एटीएसने उधळून लावला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेशी संबंधित हा दहशतवादी आहे. महंमद नदीम असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशिक्षण साहित्य पुरवले 

एटीएसने केलेल्या चौकशीच्या दरम्यान त्या दहशतवाद्याने सांगितले की, पाकिस्तानातील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने त्याला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचे काम दिले होते. सहारनपूरमधील गंगोह पोलीस  ठाण्याच्या कुंडाकलन गावात एक व्यक्ती जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) संघटेनवर प्रभावित होऊन दहशतवादी हल्ल्याची तयारी करत आहे. यानंतर महंमद नदीमची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली. तहरीक-ए-तालिबानचा दहशतवादी सैफुल्ला (पाकिस्तान) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद नदीमला दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी प्रशिक्षण साहित्य पुरवले होते. याच्या मदतीने सर्व सामान गोळा करून कोणत्याही सरकारी इमारतीवर किंवा पोलिसांच्या जागेवर हल्ला करण्याचा महंमद नदीमचा कट होता.

(हेही वाचा पंजाब नॅशनल बँकेत परीक्षेविना नोकरी, ६७,००० रुपयांचा मिळेल घसघशीत पगार)

प्रशिक्षणाला पाकिस्तानात जाणार होता 

महंमद नदीमच्या फोनवरून जैश-ए-महंमद आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीटीपी दहशतवाद्यांच्या चॅट आणि ऑडिओ मेसेज मिळाले आहेत. महंमद नदीमने चौकशीदरम्यान सांगितले की, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे 2018 पासून तो जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या संपर्कात आहे. त्याने या दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल नंबर बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. दहशतवादी संघटनांनी त्याला व्हर्च्युअल सोशल मीडिया आयडी बनवून 30 हून अधिक व्हर्च्युअल नंबर दिले होते. विशेष प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला जाणार होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.