गणपती बाप्पांचे आगमन जवळ येत असतानाच मुंबईत यंदा पीओपी गणपती मूर्तीची संख्या दरवर्षीपेक्षा जास्त असल्याचा संशय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे. तर मुंबईतील पीओपी गणपती मूर्तींची संख्या मर्यादित असल्याचा दावा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केला आहे. बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव गणपती मूर्तींपैकी ८० टक्के पीओपीच्या गणेशमूर्ती तर २ लाख २० हजार घरगुती गणेशमूर्तींपैकी ६० टक्के पीओपी मूर्ती असल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आक्षेप
येत्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळाली असली तरीही यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींची संख्या गणेशोत्सव समितीने केलेल्या दाव्यापेक्षा जास्तच असल्याचा संशय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सायन येथील प्रदूषण मंडळाच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली. मोठमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिका-यांसमवेत पुढील बैठक घेतली जावी, असा मुददा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली गेली. मुंबईतील मोठ्या प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १२ फूटांच्यावर गणपती मूर्ती ठेवल्या आहेत. यावरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला.
( हेही वाचा : भगूरला वीर सावरकर वाड्याच्या प्रांगणात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण )
यंदा जून महिन्यात तीन महिन्यांच्या अगोदर पालिकेने दिलेली नोटीस कमी दिवसांची होती. अगोदर मूर्ती बनून तयार होत्या. पुढच्या वर्षांत मोठ्या संख्येने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मुंबईत दिसतील, असे आश्वासन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहिबावकर यांनी दिले. पालिकेकडून कृत्रिम तलावांची संख्याही जास्त असल्याने जलप्रूदषणाला आळा बसेल अशी माहिती दहिबावकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिका-यांना दिली.
Join Our WhatsApp Community