राणीचा कंठहार चमकणार तिरंग्याने

145
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारती –  १०० वृक्ष – ६० विद्युत खांब – विविध थोर पुरुषांचे १९ पुतळे याप्रमाणे तिरंगी व सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईचा राणीचा कंठमनी ( क्वीन नेकलेस) पुढील तीन दिवसांत रात्रीच्या अंधारातही तिरंग्याने उजळून निघणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी उद्या शनिवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२२ पासून सोमवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संपूर्ण मुंबई महानगरात घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील प्रत्येक घरी याप्रमाणे एकूण राष्ट्रध्वज तिरंगा पोहोचवण्याचे काम महानगरपालिकेच्या यंत्रणेने बजावले आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने आवाहन केल्यानंतर काही खासगी इमारतींनी विद्युत रोषणाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात महापालिका ए विभागाच्या आवाहनानुसार मरीन ड्राइव्ह येथील समुद्र किनारी असणाऱ्या इमारतींनी विद्युत रोषणाई कारणासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारती –  १०० वृक्ष – ६० विद्युत खांब – विविध थोर पुरुषांचे १९ पुतळे याप्रमाणे तिरंगी व सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

हेरिटेज २४३ इमारतींवर विद्युत रोषणाई

महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता विभागामार्फत एकूण २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामध्ये महानगरपालिका पुरातन वास्तू ८, महानगरपालिका इमारती ८२, शासकीय इमारती ४८, खासगी इमारती १०५ याप्रमाणे इमारतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजेपासून थोड्या-थोड्या अवकाशाने प्रोजेक्शन मॅपिंग देखील केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.