प्रेयसीला भाईंदर खाडी दाखवत; खाडीत लोटले

136
भाईंदर खाडी दाखवतो असे बोलून प्रेयसीला भाईंदर खाडीजवळ आणून ती बेसावध असताना तीला खाडीत लोटून तीची हत्या करणाऱ्या प्रियकराला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. प्रेयसी सतत लग्नाचा तगादा लावत असल्यामुळे तीची हत्या केल्याची कबुली अटकेत असलेल्या प्रियकराने पोलिसांना दिली.
अंकिता शिवगण (२०)ही मलबार हिल येथील डेलिसीया इमारतीत वास्तव्यास होती. ३१ जुलै रोजी अंकिता बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या चुलत भावाने मलबार हिल पोलीस ठाण्यात दिली होती. मलबार हिल पोलिसांनी अंकिताचा सर्वत्र शोध सुरू केला होता, मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्यामुळे अखेर तपास पथकाने तिच्या मोबाईल फोन क्रमांकाची माहिती मागवली.  या माहितीत अभिषेक विठोबा सरफरे याचे सर्वात अधिक कॉल असल्याचे आढळले. तसेच अंकिता बेपत्ता झाली त्या दिवशीदेखील अभिषेक हा तिच्या संपर्कात होता.

म्हणून केली अंकिताची हत्या 

त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी अभिषेकला विरार येथून त्याच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत त्याची कसून चौकशी केली.  चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत, अंकिताला भाईंदर खाडीत लोटून तिची हत्या केल्याची कबुली दिली. अभिषेक सरफरे आणि अंकिता यांचे गावी असताना २०१६ पासून प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर ते मुंबईत आले. मागील सहा वर्षांपासून दोघांत प्रेमप्रकरण सुरू असताना अंकिता ही अभिषेकच्या मागे लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र अभिषेकला लग्न करायचे नव्हते, यासाठी त्याने अंकिताची हत्या करण्याचा कट आखला.
३१ जुलै रोजी त्याने अंकीताला भेटण्यासाठी ग्रँट रोड स्थानकावर बोलावून घेतले. तिथून तो तिला बोरिवली येथे ट्रेनने घेऊन आला आणि तिथून दोघे बसने भाईंदर येथे आले. रेल्वे रुळावरून तो तीला भाईंदरची खाडी दाखवतो, असे सांगून घेऊन आला. खाडी दाखवत असताना बेसावध अंकीताला त्याने पुलावरून  खाडीत लोटून दिले अशी कबुली अभिषेक याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, अभिषेक याला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.