मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

136

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई- पुणे महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. खालापूर टोलनाक्याजवळ सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या वीकेंडची सुरूवात झालेली आहे त्यामुळे मुंबई-पुण्यातून नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळी, आपल्या मूळ गावी दाखल होत आहेत.

( हेही वाचा : Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, पैसेही राहतील सुरक्षित; १० वर्षांनी दुप्पट फायदा)

वाहतूक कोंडी

सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुण्याकडे जाणारी संपूर्ण मार्गिका ठप्प झालेली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल अशी माहिती मिळाली आहे.

पर्यटनस्थळ फुल्ल

दरम्यान ऑगस्ट महिन्यात सलग सुट्ट्या आल्यामुळे सर्व पर्यटनस्थळांवरील हॉटेल, रिसॉर्ट ८० टक्के बुक झाली आहेत. थंड हवेच्या ठिकाणी, धरण आणि धबधब्यांच्या ठिकाणांसह कोकण, गोवा येथे जाण्यासाठी मुंबईकर पसंती दर्शवत आहेत. तसेच माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, मुरबाड, शहापूर, कर्जत, भिवपुरी, पालघर या जागांना सुद्धा सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.