समीर वानखेडे यांना दिलासा; जन्माने मुस्लिम नसल्याचा जात पडताळणी समितीचा निष्कर्ष

167

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.

समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना, त्यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

( हेही वाचा: मी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच, मंत्रीपदाचा अंतिम निर्णय शिंदे घेतील – संजय शिरसाट )

नवाब मलिक यांचे आरोप काय?

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरु होते. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचे सांगत नोकरी मिळवली. वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. तर, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम नसून, अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे. या आरोप- प्रत्यारोपात भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपल्बिकन पक्षाने या वादात उडी घेतली. या दोन्ही संघटनांनी मुंबई शहर जिल्हा जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.