मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पदाधिका-यांच्या निवडीपासून शिवसेनेबाबतचे अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. आता शिंदे गटाकडून राज्यभरात ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा आणि दादर व ठाणे येथे पक्षाचे मुख्यालय उभारण्याची घोषणा केली आहे. त्यातच आता मुंबईतील पहिल्या शाखेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले आहे.
बॅनरवरुन उद्धव, आदित्यना वगळले
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा मतदारसंघ असलेल्या मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचा नारळ वाढवण्यात आला आहे. या शाखेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो मात्र बॅनरवर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिंदे गटाची उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा
या शाखेचे उद्घाटन करताना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रियी दिली. मुंबई शहरातला हा पहिलाच वॉर्ड येतो. मुंबई शहरात इथूनच प्रवेश करण्यात येतो. त्यामुळे इथे शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन होत आहे याचा मला आनंद होतोय. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेनेच्या अशाच शाखा दिमाखात उभ्या राहतील, असेही राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community