नायगाव आणि जूचंद्र या स्थानकांदरम्यान नवीन दुहेरी रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार असून यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गाने नव्याने मार्गिका टाकण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याला अखेर यश आले असून अंदाजे ३३० कोटी रुपये खर्च करून ही मार्गिका तयार होणार आहे.
( हेही वाचा : १४ ऑगस्टपर्यंत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा)
दुहेरी रेल्वे रुळ टाकण्याचा प्रस्ताव
बोरिवली, मिरारोड, दहिसर, भाईंदर येथील हजारो नागरिक व्यापारी हे पनवेल, ठाणे, वाशी तसेच कोकणात प्रवास करत असतात. यासाठी या नागरिकांना कुर्ला किंवा दादर स्थानकातून रेल्वे पकडावी लागते. गर्दीच्या वेळी चर्चगेट लोकलने प्रवास करणे अशक्य होते म्हणूनच पश्चिम रेल्वेवरील नायगाव आणि मध्य रेल्वेवरील जूचंद्र दरम्यान नवीन दुहेरी रेल्वे रूळ टाकण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी ३३० कोटी खर्च येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community