भारतीय Currency ला पहिल्यांदा ‘रुपया’ म्हणून कोणी संबोधले? माहिती आहे का?

144

भारतीय चलनास रुपया म्हणतात. संस्कृतच्या रुप्यकमपासून रुपया हा शब्द बनला, असे मानले जाते. रुप्यकम म्हणजे चांदीचे नाणे. मध्ययुगीन कालखंडात दिल्लीच्या सुरी वंशातील शासक शेरशाह सुरी याने ‘रुपया’ या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला. त्याने 1540 ते 1545 या कालखंडात शासन केले. त्याचा रुपया 10 ग्रॅम चांदीचा असे.

1 रुपयाची नोट कधी छापली?

स्वतंत्र भारतात 1949 साली RBI ने पहिल्यांदा 1 रुपयाची नोट छापली. यात अशोक चक्राचे चित्र होते. 1954 मध्ये पुन्हा 10 हजार रुपयांची नोट छापण्यात आली. 1957 मध्ये एक रुपयास 100 पैशांत विभागण्यात आले. त्यानंतर 1,2,3,5,10,आणि 20 रुपयांची नाणी आली. 1960 मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या नोटांचे चलन सुरु झाले. 1969 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी यांचे चित्र नोटेवर छापण्यात आले.

( हेही वाचा: सरकारचा मोठा निर्णय; भारतात VLC Media Player अ‍ॅप सरकारकडून बॅन )

कागदी नोटा कधी वापरल्या?

इंग्रजी राजवटीत 1869 मध्ये पेपर करन्सी अॅक्टनंतर पहिल्यांदा कागदी नोटांचा वापर सुरु झाला. राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेल्या 10,20,50,100 आणि 1000 रुपयांच्या नोटा तेव्हा चलनात आल्या.

1923 मध्ये पंचम जाॅर्जच्या चित्राच्या नोटा आल्या. नोटा इंग्लंडला छापल्या जात. 1928 मध्ये पहिल्यांदा नाशिकला बॅंक नोट प्रेस स्थापन होऊन देशात नोटा छपाई सुरु झाली.

आरबीआयने पहिली नोट कोणती छापली?

आरबीआय भारतातील चलनी नोटा छापते. आरबीआयचे गव्हर्नर यांची नोटेवर स्वाक्षरी असते. 1935 मध्ये Reserve bank of India अॅक्टनुसार, RBI ची स्थापना झाली. 1938 मध्ये आरबीआयने पहिली 5 रुपयांची नोट छापली. पुढच्याच वर्षी 10, 100, 1000 आणि 10 हजार रुपयांच्या नोटा जारी झाल्या. 1940 मध्ये 1 रुपयाची नोट आली. त्यानंतर 1943 मध्ये 2 रुपयांची नोट आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.