अलिकडे वस्तू आणि सेवा कर(GST)मुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. वाढत्या जीएसटीमुळे केंद्र सरकारवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. आता घरभाडे आणि लग्न सोहळा देखील जीएसटीच्या कक्षेत आल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पण हा जीएसटी सरसकट लागणार नसून त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.
काय आहेत अटी?
पावसाळा संपला की साधारणपणे लग्नसराईला सुरुवात होते. पण आता लग्न सोहळ्यावर देखील जीएसटी लागणार असल्यामुळे विवाहइच्छुक जोडपी ही संभ्रमावस्थेत पडली आहेत. पण लग्न सोहळ्यांवर सरसकट जीएसटी लागणार नसून त्यासाठी केंद्र सरकारने काही अटी निश्चित केल्या आहेत. लग्नासाठी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास संबंधितांना दीड लाख रुपयांपर्यंतचा जीएसटी भरावा लागणार आहे.
यातही सर्वाधिक जीएसटी हा लग्न समारंभासाठी भाड्याने घेण्यात येणा-या गार्डनसाठी आकारण्यात येणार आहे. तसेच एक लाख रुपयांच्या लग्न मंडपासाठी 18 हजार आणि दीड लाख रुपयांपर्यंतच्या कॅटरिंग सेवेसाठी 27 हजार रुपयांचा जीएसटी भरावा लागणार आहे.
या वस्तूंवरही लागणार जीएसटी
लग्न समारंभात करण्यात येणारी सजावट,फोटो आणि व्हिडिओग्राफी,वाजंत्री यावर देखील 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. तसेच कपडे,फूटवेअर वर 5 ते 12 टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर 3 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community