‘या’ भागातील बेस्ट बसमार्ग १६ ऑगस्टपर्यंत खंडित

140

वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात नाल्याच्या भिंतीचे आणि रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे गेले कित्येक दिवस रेल्वे स्थानकापर्यंत बेस्ट सेवा दिली जात नव्हती यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते वांद्रे स्थानक, शासकीय वसाहत येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल व्हायचे. जवळपास ६ ते ७ महिने बंद असलेली ही बससेवा अलिकडेच सुरू झाली होती. बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागत नव्हती. परंतु आता वांद्रे टर्मिनसकडे जाणारी बससेवा पुन्हा एकदा १६ ऑगस्टपर्यंत खंडित करण्यात आली आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन)

हे बसमार्ग १६ ऑगस्टपर्यंत खंडित

बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनसकडे रस्त्याचे काम सुरू असल्याने बस मार्ग क्रमांक १८२४, १८३४, बीकेसी २१, बीकेसी २२, बीकेसी २३, ३०३, ३१०, ३१६, ३१७ या बसमार्गांचे प्रवर्तन १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत वांद्रे बस स्थानक पूर्व येथे खंडित केले आहेत. त्यामुळे ज्या प्रवाशांना टर्मिनसच्या दिशेने जायचे आहे अशा प्रवाशांना खासगी वाहनांने प्रवास करावा लागणार आहे.

प्रवाशांची गैरसोय

दरम्यान, वांद्रे कुर्ला संकुल परिसरात अनेक मोठमोठी खासगी कार्यालये आहेत. बीकेसीतील बस थांब्यावर सायंकाळी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. बसथांब्यावर अर्धा तास वाट पहावी लागते, त्यानंतर बसमधून प्रचंड गर्दीतून प्रवास करण्याची वेळ येथील प्रवाशांवर येते. अन्यथा, बस वेळेत न मिळाल्यास वांद्रे किंवा कुर्ला स्थानकापर्यंत चालत जावे लागते. सकाळी ८.३० ते सकाळी ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वांद्रे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या प्रवाशांची सुद्धा १६ ऑगस्टपर्यंत गैरसोय होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.